सोमेश्वर जेष्ठ नागरिक संघाचा स्वर यात्रा कार्यक्रम संपन्न

सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ आदर्श नगर, किवळे -रावेत संघाचा मे महिन्यातील सभासद अभिष्टचिंतन साजरा करण्यात आला. यात संघाच्या 36 सभासदांना शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ प्रस्तुत जुन्या- नव्या मराठी, हिंदी गीतांची कराओके मैफिल “स्वर यात्रा” या कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेवक मा. श्री निलेश भाऊ यांच्या हस्ते करण्यात आला . स्वर यात्रा कार्यक्रमात रोहिदास पिलाने ,शिवकांत जैस्वाल , सुमंगेश कुलकर्णी, भीमाशंकर जाधव ,बाळासाहेब जगदाळे ,बाळासाहेब क्षीरसागर ,मुरलीधर भोलणकर ,स्नेहा मुळे ,प्रेरणा पाटील, विजय उपासनी या गायक कलाकारांनी विविध मराठी, हिंदी भावगीत ,भक्तीगीत ,लोकगीत, फिल्मी गीत सादर केले .त्यास उपस्थित रसिक प्रेक्षकांनी प्रत्येक गीताच्या सादरीकरणानंतर टाळ्यांचा कडकडाट तर काही गीतांना वन्स मोअर ने दाद दिली.
“स्वर यात्रा” कार्यक्रमाची निर्मिती सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ संचालक मंडळ, संकल्पना -रोहिदास पिलाने यांची तर निवेदन सुरेश बडगुजर यांनी केले. संगीत संयोजक होते सुहास माणगावकर तर प्रायोजक निलेश भाऊ तरस होते
यावेळी संघाचे अध्यक्ष -सुदाम दिवटे ,उपाध्यक्ष- साहेबराव पाटील, सचिव -सुरेश बडगुजर, खजिनदार- प्रकाश सावंत, सहसचिव- तुकाराम कोरडे ,सह खजिनदार- किशोर गायकवाड, संचालक -धोंडीराम पाटील, राजेंद्र मोरे यांच्या नियोजनबद्ध संयोजनामुळे कार्यक्रम उत्तमरीत्या संपन्न झाला. कार्यक्रम बहारदार झाल्याचा अभिप्राय प्रेक्षकांच्या चर्चेतून मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *