Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
राज्य

कुणबी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा अन्याय तात्काळ थांबवा;

By Team News Beez
June 2, 2026 3 Min Read
0

महसूल मंत्री व शिक्षण मंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन; हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न – ॲड. अमोल मातेले

मुंबई, मंगळवार दि. 2 जून 2026 : इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेदरम्यान कुणबी प्रमाणपत्रधारक विद्यार्थ्यांना नॉन-क्रिमी लेयर व डोमिसाईल प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. दादा भुसे आणि महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांना सविस्तर ई-मेलद्वारे निवेदन पाठवून तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

ॲड. अमोल मातेले यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, कुणबीप्रमाणपत्रधारक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असलेली नॉन-क्रिमी लेयर व डोमिसाईल प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी महसूल विभागाच्या “सरोवर” प्रणालीवर अवलंबून राहावे लागते. मात्र मागील अनेक आठवड्यांपासून ही प्रणाली अत्यंत संथ गतीने कार्यरत असून वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे अर्ज दाखल करणे, पावती मिळविणे, प्रमाणपत्रांची पूर्तता करणे आणि डाउनलोड करणे या सर्व प्रक्रिया ठप्प झाल्या आहेत.

यामध्ये सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे विद्यार्थी आणि पालकांनी वेळेत अर्ज करूनही त्यांना शासनाच्या तांत्रिक अकार्यक्षमतेची शिक्षा भोगावी लागत आहे. अनेक विद्यार्थी महा ई-सेवा केंद्रांमध्ये दिवसेंदिवस फेऱ्या मारत आहेत. काही पालकांनी अर्ज दाखल केल्याचे पुरावे, अर्ज क्रमांक आणि ऑनलाइन नोंदी उपलब्ध करून दिल्या आहेत, तरीदेखील अनेक कनिष्ठ महाविद्यालये मूळ प्रमाणपत्रांशिवाय प्रवेश देण्यास नकार देत आहेत.आज महाराष्ट्र मुंबई मधील हजारो विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे. “आमची चूक काय?”विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज केले, पालकांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली, तरी शासनाच्या प्रणालीतील त्रुटींमुळे त्यांचे शिक्षण धोक्यात येत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. एका विद्यार्थ्याचे एक वर्ष वाया जाणे म्हणजे त्याच्या आयुष्यातील अमूल्य काळ हिरावून घेणे होय. ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ही परिस्थिती अधिक वेदनादायी ठरत आहे.

शासनाने हे लक्षात घ्यावे की, प्रवेश प्रक्रियेची मुदत संपल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याचा प्रवेश हुकला तर त्याचे मानसिक, सामाजिक आणि शैक्षणिक परिणाम दीर्घकालीन असू शकतात. अनेक विद्यार्थी आणि पालक आज नैराश्य, तणाव आणि असुरक्षिततेच्या वातावरणात जगत आहेत.
ॲड. अमोल मातेले यांनी शासनाकडे केलेल्या प्रमुख मागण्या नॉन-क्रिमी लेयर व डोमिसाईल प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी. पालकांच्या हमीपत्राच्या आधारे विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देण्याचे आदेश सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात यावेत.

महा ई-सेवा केंद्रातील अर्ज क्रमांक, अर्जाची पावती, ऑनलाइन अर्जाचा पुरावा अथवा स्क्रीनशॉट यांना तात्पुरता वैध पुरावा म्हणून मान्यता देण्यात यावी. केवळ प्रमाणपत्रे प्रलंबित असल्याच्या कारणावरून कोणत्याही विद्यार्थ्याचा प्रवेश नाकारला किंवा रद्द केला जाऊ नये.महसूल विभाग आणि शिक्षण विभाग यांनी संयुक्त समन्वय समिती स्थापन करून तातडीने विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत. “सरोवर” प्रणालीतील तांत्रिक अडचणी युद्धपातळीवर दूर करून प्रलंबित अर्जांचा विशेष अभियानाद्वारे निपटारा करण्यात यावा.

सरकारला इशारा यावेळी ॲड. अमोल मातेले यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा गनिमी काव्याने आम्हाला आंदोलन करावे लागेल.विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. शासनाच्या यंत्रणेमधील तांत्रिक बिघाड आणि प्रशासकीय विसंगतींचा भार विद्यार्थ्यांवर टाकला जाणार असेल तर त्याविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

महाराष्ट्र सरकारने हा विषय केवळ कागदोपत्री प्रशासकीय प्रश्न म्हणून न पाहता हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी आणि भविष्याशी संबंधित संवेदनशील विषय म्हणून पाहावा. विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील स्वप्ने तुटू नयेत, त्यांचे एक शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी तात्काळ निर्णय घेणे ही काळाची गरज आहे.

– ॲड. अमोल मातेले
प्रदेश प्रवक्ता
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार
युवक मुंबई अध्यक्ष

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

सोमेश्वर जेष्ठ नागरिक संघाचा स्वर यात्रा कार्यक्रम संपन्न

Next

गोपाळगड किल्ल्याच्या मालकी व संवर्धनाबाबत 15 दिवसांत अहवाल सादर करा – मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
  • बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
  • दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

CATEGORIES

  • Uncategorized (439)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
July 23, 2026

Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून वडीवळे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : राजगड (वेल्हा) तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माळवडी–जोगवडी–भुतुंडे–बालवड–शेनवड या प्रमुख मार्गावरील बालवड येथे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी नाशिक फाटा–खेड दुहेरी उन्नत कॉरिडॉर...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – एका बेकरीत बालमजुराला कामावर ठेवल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या एका महिलेला दारूबंदी पथकाने...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बँक खाते वापरण्‍यास देऊन ११ लाखांची सायबर फसवणूक

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बँक खाते उघडून संघटित सायबर गुन्हेगारी टोळीला फसवणुकीचे पैसे स्वीकारण्यासाठी...

Read More
July 23, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme