अश्लील हावभाव करणाऱ्या महिलेवर गुन्हा

सार्वजनिक रस्त्यावर वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करत येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका महिलेवर कारवाई करण्यात आली. ही घटना सोमवार (१ जून) रोजी सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास देहूफाटा येथील मोरे वडापाव समोर सार्वजनिक रस्त्यावर घडली. या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ खळसोडे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने सार्वजनिक ठिकाणी वेश्या व्यवसायाच्या हेतूने ये-जा करणाऱ्या नागरिकांना उद्देशून लैंगिक हावभाव केले आणि शब्द उच्चारले. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीस व लोकांना अडथळा निर्माण होऊन सार्वजनिक शिष्टाचाराचा तसेच सभ्यतेचा भंग झाला. दिघी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *