पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – पिंपळे सौदागर येथील पी. के. चौकाजवळ भरधाव दुचाकीने बीआरटी बसस्टॉपच्या भिंतीला धडक दिल्याने चालकाचा मृत्यू झाला. ही घटना १ जूनच्या मध्यरात्री साडेअकरा ते साडेबारा वाजताच्या दरम्यान घडली.
संकेत प्रभाकरराव गुंजकर (रा. वनाज, पुणे) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मित्र लोकेश अच्युतराव साळापुरीकर (वय ३३, रा. चाकण) यांनी मंगळवारी (दि. २ जून) रोजी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत हा पल्सर दुचाकी भरधाव व बेजबाबदारपणे चालवत असताना त्याने बसस्टॉपला धडक दिली. अपघातात तो गंभीर जखमी झाला व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर फिर्यादी लोकेश हा गंभीर जखमी झाला. सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
भरधाव दुचाकीची बीआरटी बसस्टॉपला धडक; चालकाचा मृत्यू
