पिंपरी, dि. ३ (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील मरकळ येथे जुन्या वादातून सहा जणांच्या टोळीने एका तरुणावर कोयता व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. ही घटना १ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली.
ज्ञानेश्वर महादेव पाचपुते (वय २२, रा. मरकळ) यांनी मंगळवारी (दि. २ जून) रोजी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बजरंग टाकळकर, निखिल टाकळकर, विलास टाकळकर, प्रज्वल टाकळकर, अभिषेक लोखंडे व पंकज साळुंखे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “बी.टी. कंपनीच्या नादी लागू नका” असे म्हणत आरोपींनी हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. प्रज्वल टाकळकर याला अटक करण्यात आली आहे. आळंदी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
जुन्या वादातून कोयत्याने जीवघेणा हल्ला; एक आरोपी अटकेत
