अवैध गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश; एक जेरबंद

पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – म्हाळुंगे एमआयडीसी परिसरातील ओम साई गॅस सेल्स येथे घरगुती सिलेंडरमधून बेकायदेशीर गॅस रिफिलिंग सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला. ही कारवाई मंगळवारी (दि. २ जून) रोजी करण्‍यात आली आहे.
निरण जितेन कमान (वय ३५, रा. महाळुंगे, ता. खेड, जि. पुणे) याला ताब्यात घेतले. दुकान मालक प्रशांत पायगुडे याच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस अंमलदार मंगेश देवराम कदम यांनी मंगळवारी (दि. २ जून) रोजी उत्‍तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, कोणतीही सुरक्षा व्यवस्था न ठेवता व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरून मानवी जीवित धोक्यात घातल्याचा आरोप आहे. पुढील तपास उत्‍तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *