झेन स्पावर छापा; वेश्याव्यवसाय प्रकरणी महिला अटकेत

पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – पिंपळे निलख, विशालनगर येथील झेन स्पावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली. ही कारवाई सोमवारी (दि. १ जून) रोजी रात्री सव्‍वाआठ वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.
स्वाती सत्यदेव खंदारे (वय ३४, रा. पुनावळे) हिला अटक करण्यात आली आहे. महिला पोलीस हवालदार निलम संतोष बुचडे यांनी मंगळवारी (दि. २ जून) रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपीने महिलांना पैशांचे आमिष दाखवून स्पामध्ये वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *