पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पिंपरी, तळेगाव, भोसरी एमआयडीसी, दक्षिण महाळुंगे, दिघी, चिखली, आळंदी, चाकण, शिरगाव, रावेत आणि देहूरोड पोलीस स्टेशनच्या भागात पोलिसांनी विविध ठिकाणी धाडी टाकून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दारूसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी २१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंगळवारी (दि. २ जून) रोजी सकाळपासून ते रात्रीपर्यंत या कारवाया करण्यात आल्या. यात पोलिसांनी गावठी हातभट्टीची दारू, रसायन, देशी-विदेशी दारूच्या बाटल्या आणि वाहतुकीसाठी वापरलेली रिक्षा असा एकूण लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महेश हरीहर राऊत (वय २५, रा. भारत नगर, पिंपरी), सूर्यकांत नथू कारके (वय ५५, रा. उर्से, मावळ), शिवाजी बाबुराव थोंटे (वय ४८, रा. चिखली), रणजित माचरे, ममता माचरे (रा. पिंपरी), पिंटु राजाराम अहिरवाल (वय २८, रा. आंबेठाण), अनिकेत शिवाजी थोरात (वय ३४, रा. चिखली), सलीम निजाम पठाण (वय ३२, रा. तळेगाव), रामेश्वर तुकडाजी पसरटे (वय २२, रा. चऱ्होली), दृष्टी अंशुमनबिरावत (वय २१, रा. चिखली), गौरी रवींद्र राजपूत (वय ३८, रा. चिंबळी), द्रौपदी मनोज कुंभार (वय ४५, रा. चिखली), माउली राजेंद्र नाकाडे (वय १९, रा. चाकण), रमेश गुलाब रजपुत (वय ४०, रा. भांबोली), गुरुदास दत्तात्रय शितोळे (वय ४४, रा. दारुंब्रे), परशुराम आण्णा पडवळ (वय ३५, रा. बोरदरा), अमिन खाजाभाई शेख (वय ५०, रा. रावेत), मकबुल अजगर अली (वय २२, रा. चिंचोली), लता दशरथ मोहिते (वय ६५, रा. मामुर्डी), सोमनाथ नागेशप्पा हनोरे (वय ४६, रा. पिंपळे सौदागर) आणि क्रिष्णा नागनाथ डोमसे (वय २६, रा. येलवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणी पोलीस अंमलदार दिनेश पुंडे (वय ३१, पिंपरी पो.ठाणे), निलेश जाधव (खंडणी विरोधी पथक), विनोद वीर (मालमत्ता गुन्हे विरोधी पथक), प्रदीप चौगुले, राजेंद्र खेडकर, सोमनाथ खळसोडे, नारायण सोमवंशी, विशाल बारवकर, संतोष भोर, हरीराम डुमनर, सुमित जगझाप, संतोष वायकर, रोशन डोंगरे, मनोज पांगरे, निखिल कपले, बाबासाहेब क्षीरसागर, शुभम बावणकर, शैलेश काळभोर आणि भाग्यश्री गायकवाड यांनी आपापल्या पोलीस ठाण्यात फिर्यादी दिल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना, बेकायदेशीररित्या मानवी शरीरास अपायकारक असणारी गावठी दारू व विविध नामांकित कंपन्यांची देशी-विदेशी दारू बाळगून ग्राहकांना विक्री करत असताना रंगेहात पकडले गेले. संबंधित परिसरातील पोलीस ठाणी या सर्व गुन्ह्यांचा पुढील तपास करत आहेत.
पिंपरी-चिंचवड परिसरात बेकायदेशीर दारूविक्री करणाऱ्यांवर पोलिसांचा मोठा छापा! विविध पोलीस ठाण्यांमध्ये २१ गुन्हे दाखल
