पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – आकुर्डीतील इलास्टिक रन कुरिअर कंपनीतून २ लाख ७५ हजार रुपयांहून अधिक किमतीचे मोबाइल चोरी करण्यात आले. याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना १ मे ते ३१ मे २०२५ या कालावधीत आकुर्डी येथे घडली.
ऋषिकेश राम कनमुसे (वय २०, रा. चिखली) आणि ओमकार विष्णू शिंगाडे (वय १९, रा. निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. कंपनीचे अधिकारी रजत अभयकुमार वाव्हाळ (वय २८, रा. वाकड) यांनी मंगळवारी (दि. २ जून) रोजी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात आरोपींनी संगनमताने कंपनीच्या स्टॉकमधील महागडे मोबाइल चोरल्याचे तपासात समोर आले आहे. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.
कुरिअर कंपनीतील २.७५ लाखांचे मोबाइल लंपास; दोघे अटकेत
