पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – हिंजवडी पोलिसांनी भोईरवाडी मान रोडवर महात्मा फुले अपंग प्रशिक्षण केंद्रासमोर मंगळवारी (दि. २ जून) एक कारवाई केली. या कारवाई मध्ये पोलिसांनी १०.३०० किलो वजनाचा अफूच्या बोंडाचा चुरा (डुडा चुरा) जप्त केला.
पुष्पेंद्र सिंग किरपाराम (वय ३९, रा. राजस्थान) याला याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मधुकर कोळी यांनी बुधवारी (दि. ३ जून) रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोईरवाडी मान या रॊडवर एकजण डुडा चुरा विक्रीसाठी आला असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून पुष्पेंद्र याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये १०.३०० किलो वजनाचा अफूच्या बोंडाचा चुरा (डुडा चुरा) आढळून आला. पोलिसांनी डुडा चुरा, मोबाईल आणि रोख रकमेसह एक लाख ६० हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
निगडी मध्ये गांजा जप्त
निगडी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाया आकारत ३६.३७ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. यामध्ये एका महिलेसह दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी १८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. निगडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
हिंजवडी मध्ये १० किलो डुडा चुरा जप्त
