पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – रस्त्यावर थांबून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अश्लिल हावभाव केल्या प्रकरणी दिघी आणि बावधन पोलीस ठाण्यांमध्ये पाच महिलांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाया बुधवारी (दि. ३ जून) रोजी करण्यात आल्या.
दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन कारवाया झाल्या. आळंदी मधील योगीराज चौकात थांबून या महिला जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांकडे पाहून अश्लील इशारे करत होत्या. दोन वेगवेगळ्या कारवाया करत दोन महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले. बावधन येथील मुंबई-बेंगलोर महामार्गावर दोन आणि भूगाव येथे एक अशा तीन कारवाया केल्या. या ठिकाणी देखील या महिला सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग करत होत्या.
अश्लील हावभाव प्रकरणी पाच महिलांवर कारवाई
