Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

शहरातील गुन्हेगारी टोळ्यांवर पोलिसांचा मोठा घाव; ५ टोळ्यांतील ४५ सराईतांवर मकोकाची कारवाई

By Team News Beez
June 6, 2026 2 Min Read
0

आयुक्त विनय कुमार चौबे यांचा संघटित गुन्हेगारीविरोधात निर्णायक बडगा; देहूरोड, काळेवाडी, म्हाळुंगे आणि चिखलीतील टोळ्यांना जबर दणका

पिंपरी-चिंचवड :
पिंपरी-चिंचवड शहरात दहशत माजवून खंडणी, मारामाऱ्या, दरोडे, अंमली पदार्थांची विक्री आणि बेकायदेशीर धंद्यांद्वारे वर्चस्व निर्माण करणाऱ्या संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर पोलीस आयुक्तालयाने मोठा प्रहार केला आहे. शहरातील पाच सक्रिय टोळ्यांमधील तब्बल ४५ सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

शहरात गेल्या काही महिन्यांपासून काही टोळ्यांकडून दहशत निर्माण करण्याचे प्रकार वाढले होते. जबरी चोरी, खंडणी, शस्त्रांचा धाक, मारामाऱ्या आणि अंमली पदार्थांच्या व्यवहारातून या टोळ्यांनी आपले जाळे मजबूत केले होते. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेने टोळ्यांच्या हालचालींची गोपनीय माहिती संकलित केली. त्यानंतर संबंधित प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करण्यात आला. मंजुरी मिळताच मकोकाअंतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन कुख्यात टोळ्यांवर सर्वाधिक कारवाई झाली. आफताब समीर शेख याच्या टोळीतील सात जणांवर तर साबीर समीर शेख याच्या टोळीतील तब्बल १७ जणांवर मकोका लागू करण्यात आला. काळेवाडी परिसरातील विकी शंभूसिंग सुतार आणि त्याच्या साथीदारांवरही कारवाई करण्यात आली. म्हाळुंगे परिसरातील सागर बाळू जावळे याच्या टोळीतील सात जणांवर मकोका लावण्यात आला. चिखली परिसरातील अंबादास उर्फ सोन्या राठोड आणि त्याच्या टोळीतील सहा जणांनाही या कारवाईचा फटका बसला आहे.
पोलीसांच्या मते, या टोळ्यांकडून आर्थिक फायद्यासाठी संघटित पद्धतीने गुन्हे केले जात होते. परिसरात दहशत निर्माण करून वर्चस्व राखण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यामुळे कठोर कारवाई अपरिहार्य बनली होती.
ही विशेष मोहीम पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त तेली तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
संघटित गुन्हेगारीला शहरात कोणतीही जागा दिली जाणार नाही. नागरिकांच्या सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही. यापुढेही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, असा स्पष्ट संदेश या धडक मोहिमेतून पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

स्पाच्या आड सुरू होता अनैतिक व्यवसाय; वाकडमध्ये पोलिसांचा छापा, दोन महिलांची सुटका

Next

पुण्यातील तुळापुरात रेव्ह पार्टीवर? पोलिसांचा छापा

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ उपक्रमाचा पंढरपुरात समारोप; स्वच्छतादूत, डॉक्टर आणि स्वयंसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
  • लक्ष्मीनारायण व्यायामशाळा आखाड्याच्या पुनर्विकासाबाबत विधानभवनात आढावा बैठक; परंपरा जपत शाश्वत तोडगा काढण्याचे निर्देश
  • पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ‘अजितदादा पवार कृषी समृद्धी योजना’ सुरू; एआय आधारित शेतीला चालना
  • ‘भीतीदायक’ ते ‘जनस्नेही मित्र’; आयकर विभागाच्या कार्याचे राज्यपालांकडून कौतुक
  • सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याबद्दल सायोनी घोष यांचे स्वागत; विरोधकांवर राजकारणाचा आरोप

CATEGORIES

  • Uncategorized (454)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (879)
  • पुणे (135)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ उपक्रमाचा पंढरपुरात समारोप; स्वच्छतादूत, डॉक्टर आणि स्वयंसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
  • लक्ष्मीनारायण व्यायामशाळा आखाड्याच्या पुनर्विकासाबाबत विधानभवनात आढावा बैठक; परंपरा जपत शाश्वत तोडगा काढण्याचे निर्देश
  • पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ‘अजितदादा पवार कृषी समृद्धी योजना’ सुरू; एआय आधारित शेतीला चालना
July 25, 2026

‘निर्मलवारी-समृद्धवारी’ उपक्रमाचा पंढरपुरात समारोप; स्वच्छतादूत, डॉक्टर आणि स्वयंसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

Sumedh Chapalgaonkar

पंढरपूर : ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे राबविण्यात आलेल्या ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

लक्ष्मीनारायण व्यायामशाळा आखाड्याच्या पुनर्विकासाबाबत विधानभवनात आढावा बैठक; परंपरा जपत शाश्वत तोडगा काढण्याचे निर्देश

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : श्री लक्ष्मीनारायण व्यायामशाळा, आखाडा चिंचपोकळी यांच्या पुनर्विकासानंतरही आखाड्याची ऐतिहासिक परंपरा आणि क्रीडा उपक्रम...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ‘अजितदादा पवार कृषी समृद्धी योजना’ सुरू; एआय आधारित शेतीला चालना

Sumedh Chapalgaonkar

पुणे : बदलत्या हवामानामुळे शेती क्षेत्रासमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आवश्यक...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

‘भीतीदायक’ ते ‘जनस्नेही मित्र’; आयकर विभागाच्या कार्याचे राज्यपालांकडून कौतुक

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून करप्रणाली अधिक पारदर्शक, सुलभ आणि करदाताकेंद्रित बनवल्याबद्दल राज्यपाल जिष्णु देव...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याबद्दल सायोनी घोष यांचे स्वागत; विरोधकांवर राजकारणाचा आरोप

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेतल्यानंतर बंडखोर तृणमूल काँग्रेस...

Read More
July 25, 2026
July 24, 2026

Delhi-सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर इमरान मसूद यांची टीका; ‘हे अण्णा हजारे पार्ट-2, सर्व काही स्क्रिप्टेड’

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार इमरान मसूद यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर टीका...

Read More
July 24, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme