पुणे शहरातील तुळापूर येथील एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या कथित रेव्ह पार्टीवर पुणे शहर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान नशेच्या अवस्थेतील अनेक तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बंगल्यात मोठ्या आवाजात संगीत सुरू असताना मद्य आणि अमली पदार्थांच्या सेवनाचा संशय व्यक्त करण्यात आला होता. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकत पार्टीत सहभागी असलेल्या अनेकांची चौकशी सुरू केली आहे.छाप्यामध्ये नशेसाठी वापरले जाणारे संशयित पदार्थ, मद्याच्या बाटल्या तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या पदार्थांची तपासणी करण्यात येत असून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.या प्रकरणी आयोजक, बंगला मालक आणि पार्टीत सहभागी झालेल्यांची भूमिका तपासली जात असून संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पुण्यातील तुळापुरात रेव्ह पार्टीवर? पोलिसांचा छापा
