Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
राज्य

सुपा पोलिसांची तत्पर कारवाई; अपहरण झालेल्या तरुणाची सुखरूप सुटका, दोन आरोपी जेरबंद

By Team News Beez
June 7, 2026 1 Min Read
0

सुपा : सुपा पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या अपहरण प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा लावत पोलिसांनी अपहरण झालेल्या तरुणाची सुखरूप सुटका केली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

दि. ७ जून २०२६ रोजी ऋषिकेश विजय चांदगुडे (रा. दंडवाडी, ता. बारामती) याचे अपहरण झाल्याची माहिती सुपा पोलिसांना मिळाली. लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून ओंकार प्रकाश भोसले व तन्मय सुधीर साळुंखे यांनी ऋषिकेश यास जबरदस्तीने सासवडच्या दिशेने नेल्याची माहिती समोर आली.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. जेजुरी, सासवड, उरुळीकांचन आणि यवत पोलीस ठाण्यांना नाकाबंदीच्या सूचना देण्यात आल्या. तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयितांचे लोकेशन दिवेघाट परिसरात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी व त्यांच्या पथकाने संशयित वाहनाचा पाठलाग सुरू केला.

सासवड पोलिसांच्या मदतीने झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथे संशयित स्विफ्ट कार अडविण्यात आली. वाहनामध्ये ओंकार प्रकाश भोसले (वय २७), तन्मय सुधीर साळुंखे (वय २०) आणि दिव्या ओंकार भोसले (वय २२) आढळून आले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी अपहरण झालेल्या ऋषिकेश चांदगुडे याचा शोध घेऊन त्याची सुखरूप सुटका केली.

या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ११९/२०२६ अन्वये बीएनएसच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ओंकार भोसले व तन्मय साळुंखे यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

आमदार विजयकुमार गावित यांची अनिल देशमुख यांनी घेतली भेट; प्रकृतीची केली विचारपूस

Next

दक्षिण कोकणात मान्सून दाखल; १५ जूनपर्यंत पावसाचा जोर कमी राहणार, शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • बनावट ट्रॅव्हल्स कंपनीच्या बँक खात्याद्वारे सायबर फसवणूक
  • बेकायदेशीर विदेशी दारू विकणार्‍या महिलेवर कारवाई
  • घरात घुसून दोन महिलांना मारहाण
  • बँक खात्याचा सायबर गुन्ह्यासाठी वापर
  • सोसायटीच्या समोरून दुचाकीची चोरी

CATEGORIES

  • Uncategorized (472)
  • क्राईम (254)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (887)
  • पुणे (135)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • बनावट ट्रॅव्हल्स कंपनीच्या बँक खात्याद्वारे सायबर फसवणूक
  • बेकायदेशीर विदेशी दारू विकणार्‍या महिलेवर कारवाई
  • घरात घुसून दोन महिलांना मारहाण
July 26, 2026

बनावट ट्रॅव्हल्स कंपनीच्या बँक खात्याद्वारे सायबर फसवणूक

Team News Beez

पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – ट्रॅव्हल्स कंपनीच्या नावाने बँक खाते उघडून देशातील 35 नागरिकांची सायबर...

Read More
July 26, 2026
July 26, 2026

बेकायदेशीर विदेशी दारू विकणार्‍या महिलेवर कारवाई

Team News Beez

पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – दापोडी येथे जुन्या पुणे-मुंबई हायवेवर पदपथावर बेकायदेशीरपणे विदेशी दारूची विक्री...

Read More
July 26, 2026
July 26, 2026

घरात घुसून दोन महिलांना मारहाण

Team News Beez

पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – निगडी येथील ओटा स्कीम परिसरात ओळखीच्या तरुणाने घरात घुसून दोन...

Read More
July 26, 2026
July 26, 2026

बँक खात्याचा सायबर गुन्ह्यासाठी वापर

Team News Beez

पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – बँक खात्याचा वापर संघटित सायबर गुन्हेगारीच्या आर्थिक व्यवहारांसाठी करण्यात आला....

Read More
July 26, 2026
July 26, 2026

सोसायटीच्या समोरून दुचाकीची चोरी

Team News Beez

पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – एका सोसायटीच्या बाहेर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली....

Read More
July 26, 2026
July 26, 2026

दारू आणि गुटख्याची विक्री करणार्‍यावर कारवाई

Team News Beez

पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे देशी दारू आणि सुगंधी तंबाखू व गुटखा बाळगणार्‍या एकाला...

Read More
July 26, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme