तळेगाव एमआयडीसी परिसरात जुगार अड्ड्यावर छापा

एमआयडीसी रोडवर जलशुद्धीकरण केंद्राच्या समोर झाडाच्या खाली बेकायदेशीरपणे तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई शनिवारी (६ जून) दुपारी १२ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास नवलाख उंब्रे गावच्या हद्दीत करण्यात आली. भीमराव तुकाराम राठोड (६३, चरहोलीफाटा), रवींद्र भानुदास शिंदे (३५, परंदवडी), रामदास दत्तु भेगडे (४३, तळेगाव दाभाडे), प्रसाद तानाजी पवार (२९, कान्हेवाडी) आणि सचिन शरद बिरामणे (३९, आंबेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलीस कॉन्स्टेबल रोशन पगारे यांनी या प्रकरणात तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एकूण ४ हजार १९० रुपये रोख रक्कम आणि ५० जुगाराचे पत्ते जप्त केले आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *