पिंपरी मध्ये दोघांना दगडाने मारहाण

पिंपरी येथील बौद्धनगर परिसरात किरकोळ कारणावरून एका तरुणाला आणि त्याच्या भावाला शिवीगाळ करत दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी (८ जून) रात्री १० वाजण्याच्या सुमारास बौद्धनगर येथे घडली.

या प्रकरणात शाहिद तैमुर शेख (२७, बौद्धनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांच्या घराशेजारी राहणारा जल्ला उर्फ मेहताब शेख (१८, बौद्धनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांच्या घराशेजारी राहणाऱ्या आरोपीने अचानक फिर्यादी शाहिद आणि त्यांचा भाऊ साहिल या दोघांना कारणाशिवाय शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात आणि खांद्यावर दगडाने जोरात मारून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *