आधार कार्ड मागितल्याच्या कारणावरून पत्नीला मारहाण

तळेगाव दाभाडे येथील मंत्रा सिटी सोसायटीत आधार कार्ड मागितल्याच्या कारणावरून एका व्यक्तीने आपल्या पत्नीला मुलाच्या सायकलने मारहाण करून जखमी केले. ही घटना सोमवारी (८ जून) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणात ३७ वर्षीय यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती सागर पंढरीनाथ राजगुरु (खळदे मळा, तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला घरी असताना आरोपी पती तिथे आला. मला आणि मुलाला आधार कार्ड काढायचे असल्याने तुमचे आधार कार्ड द्या, असे फिर्यादीने म्हटल्यावर आरोपीने वाद घालण्यास सुरुवात केली. त्याने “माझे नाव कुठेही लावायचे नाही, मी सांगेन तेच तू ऐकायचे” असे म्हणत शिवीगाळ केली. फिर्यादीने लग्नाचा जाब विचारला असता, आरोपीने चिडून जाऊन मुलाच्या वाढदिवसाला भेट मिळालेल्या ट्रायसिकलने फिर्यादीच्या पायावर आणि हातावर मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *