सोमाटणे येथे तडीपार गुंडाला अटक

पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केलेला गुंड कोणतीही परवानगी न घेता पुणे जिल्ह्यात आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (९ जून) सायंकाळी सोमाटणे गाव मावळ येथे करण्यात आली. मयूर सुहास मुऱ्हे (३०, सोमाटणे, मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मयूर याला १३ नोव्हेंबर २०२५ रोजी पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्हा आणि रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो मावळ तालुक्यात आला. त्याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला अटक केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *