कंपनीच्या स्टोअरमधून हॅमर मशीनची चोरी

बेबडओव्हळ येथील ए.टी.जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या स्टोअर रूममध्ये ठेवलेली ७ हजार रुपये किमतीची बॉस कंपनीची महागडी हॅमर मशीन एका कामगाराने चोरून नेली. ही घटना मंगळवारी (९ जून) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली.

या प्रकरणात कंपनीचे सुपरवायझर गंगाराम तेजसिंग यादव (४०, बेबडओव्हळ, मावळ) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लहू गौतम गायकवाड (३५, पिंपळखुटे, मावळ) याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लहू हा बेबडओव्हळ येथील ए.टी.जी कंपनीत काम करत आहे. त्याने कंपनीच्या स्टोअरमध्ये प्रवेश केला. तेथे ठेवलेली ७,००० रुपये किमतीची बॉस कंपनीची निळ्या रंगाची हॅमर मशीन ही कोणालाही काहीही न विचारता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरून घेऊन गेला. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *