जमिनीच्या वादातून पुतण्याला हीनतेची वागणूक

खेड तालुक्यातील सावरदरी गावात जमिनीबाबत सुरु असलेल्या न्यायालयीन वादावरून चुलत्याने अपंग पुतण्याला हीनतेची वागणूक देत धमकी दिली. ही घटना ६ जून रोजी दुपारी घडली.

या प्रकरणात रोहीदास ज्ञानेश्वर घनवट (४३, पाटील नगर, चिखली; मूळ- वासुली, खेड) यांनी उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचे चुलते बाबाजी तुकाराम घनवट (शिंदेगाव, खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी चुलत्यामध्ये वडिलांच्या जमिनीचा कोर्टात दावा सुरू आहे. याच कारणावरून आरोपी बाबाजी याने फिर्यादीच्या जवळ येत विनाकारण शिवीगाळ केली आणि “ह्या पांगळ्याने आम्हाला कोर्ट कचेऱ्या पाहायला लावल्या, ह्या पांगळ्याला मी सोडणार नाही, हा पांगळा नीट कसा राहतो ते मी पाहतो” असे शब्द वापरून त्यांच्या अपंगत्वाचा जाहीर अपमान केला व जनमानसात हिणवले. उत्तर महाळुंगे पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *