पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – वाहन मालकांच विश्वास संपादन करून त्याचे आयशर ट्रक व इतर साक्षीदारांचे टेम्पो भाड्याने घेऊन, त्याचे भाडे न देता वाहने हडप करून फसवणूक केली. ही घटना देहूरोड परिसरात उघडकीस आली आहे.
किशोर मारुती पडदुने (वय ४०, रा. शेलुगाव, ता. खेड, मूळ- संभाजीनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. किरण रामदास तावरे (वय ३२, रा. वृंदावन पार्क, विठ्ठलवाडी, देहूगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीचा ट्रक भाड्याने घेतला आणि डिसेंबर २०२५ पासून त्याचे भाडे व वाहन परत केले नाही. तसेच मारुती चाटे आणि नारायण दीक्षित यांचीही वाहने भाड्याने घेऊन, भाडे न देता तसेच वाहन परत न करता त्यांची फसवणूक केली. पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहे.
वाहने भाड्याने घेऊन लाखो रुपयांची फसवणूक
