पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – लिफ्टमधील शू रॅकवर थुंकल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात एका जोडप्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. ही घटना मोरवाडी येथे बुधवारी (दि. १० जून) रोजी रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास घडली.
कविता योगेश उभयकर (रा. मोरवाडी, पिंपरी) या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलावरही गुन्हा दाखल केला आहे. एका महिलेने गुरुवारी (दि. ११ जून) रोजीसंत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती लिफ्टमध्ये थुंकल्याच्या कारणावरून बोलत असताना आरोपीने त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दोघांनी संगणमत करून फिर्यादीच्या पतीवर चाकूने भोकसून वारही केले. या घटनेचा पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहे.
लिफ्टमध्ये थुंकल्याच्या कारणावरून पती-पत्नीवर चाकूने हल्ला
