Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पुणे

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतला ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा

By Team News Beez
June 12, 2026 3 Min Read
0

पुणे ग्रँड टूर स्पर्धेच्या अनुषंगाने नियामक परिषद स्थापन करावी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

पुणे – यावर्षी आयोजित केलेल्या पहिल्या ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनातून आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा उपक्रम उभा करण्याचे आव्हान अत्यंत कमी कालावधीत साध्य केले. आता पुढील वर्षीच्या दुसऱ्या पर्वाच्या आयोजनाच्या माध्यमातून या स्पर्धेची उंची, दर्जा, व्याप्ती आणि प्रभाव अजून पुढे न्यायचा असून नवा मापदंड निर्माण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

दरम्यान तयारीचा आढावा व निर्णय घेण्यासाठी नियामक परिषद स्थापन करण्यात यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. यावेळी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, क्रीडा व युवक सेवा आयुक्त दीपक सिंगला, पीएमआरडीएच्या अतिरीक्त आयुक्त मंजुलक्ष्मी के., अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, सीएफआयचे महासचिव मनिंदर पाल सिंह (दूरदृष्य प्रणालीद्वारे) आदी उपस्थित होते.

ग्रँड टूर २०२७ चे उद्दिष्ट केवळ गेल्या वर्षाची पुनरावृत्ती करणे एवढेच नसल्याचे सांगून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अगदी शहरापासून ग्रामीण भागापर्यंत, तळागाळापर्यंत ही स्पर्धा पोहोचलेल्या गतवर्षीच्या ‘पुणे ग्रँड टूर’चा आनंद सर्वांनी घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळाने ही स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली. या ग्रँड टूरची संकल्पना, त्यामागील दूरदृष्टी आणि उपक्रम प्रत्यक्षात आणण्याचा पाया तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांनी रचला. पुणे हे केवळ शैक्षणिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक केंद्र न राहता जागतिक दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचे केंद्र बनावं, महाराष्ट्रातील युवकांना सायकलिंगसारख्या उत्कृष्ट क्रीडा प्रकारांसाठी व्यासपीठ मिळावे आणि पुण्याचे आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर आपले वेगळे स्थान निर्माण व्हावे ही त्यांची दूरदृष्टी होती, असे स्पष्ट केले.

सर्व विभाग, अधिकारी, कर्मचारी, स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा, स्वयंसेवक आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी आदी अनेक यंत्रणा, विभाग, विविध भागधारक यांनी मर्यादित कालावधीमध्ये एकत्र येऊन अतिशय उत्तमरित्या काम केल्याने ही अतिशय सुंदर अशी स्पर्धा पार पडली, असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.

आगामी स्पर्धेमुळेही आपल्या ऐतिहासिक वास्तू, ऐतिहासिक स्थळे जगाच्या पटलावर येऊन पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वासही सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.

आगामी स्पर्धेसाठी राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था व नागरी संस्था आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाची नियामक परिषद (गव्हर्निंग कौन्सिल) स्थापन करण्यात यावी. गव्हर्निंग कौन्सिलने दरमहा बैठक घेऊन तयारीचा प्रगतीचा आढावा घ्यावा. ही परिषद पुणे टूरची सर्वोच्च धोरणात्मक आणि देखरेख करणारी संस्था असावी. त्यासोबतच आयोजन समितीही स्थापन करण्यात यावी, असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या. त्यात प्रत्येक समिती, प्रत्येक विभाग आणि प्रत्येक अधिकाऱ्याच्या भूमिका, जबाबदाऱ्या, अधिकार आणि स्पष्टपणे निश्चित करण्यात याव्यात, असेही सांगितले.

स्पर्धेच्या आयोजनासाठी राज्य शासनाकडून निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. परंतु, यावर्षीच्या स्पर्धेचे क्षेत्र मोठे असून स्पर्धेच्या निधीसाठी सर्व महानगरपालिका तसेच अन्य यंत्रणांना सहभागी करुन घेणे आवश्यक आहे, असेही मत मांडले.

विभागीय आयुक्त श्रीमती तेली- उगले यांनी स्पर्धेसाठी स्वच्छता ही आपली सामाजिक जबाबदारी म्हणून ती हाती घेतली पाहिजे. स्पर्धा जाणाऱ्या गावातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बाबत प्रायोगिक तत्त्वावर राबविले पाहिजेत. त्यासाठी कचऱ्याचे घनीकरण (कॉम्पॅक्टिंग) करण्याचे प्रकल्प राबवून तो कचरा जवळच्या शहरांच्या कचरा डेपोंना पाठवता येऊ शकतात. स्पर्धेसाठी इको टुरिझम अंतर्गत बांबूच्या वस्तू तयार करून वापर करता येईल, असे स्पष्ट केले.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी, गतवेळच्या स्पर्धेसाठी पोलीस दलाला मोठ्या प्रमाणात साहित्य, वाहने वेळेत उपलब्ध करून देण्यात आली. यावर्षीच्या स्पर्धेत अजून लोकांचा सहभाग वाढेल असे प्रयत्न आहेत. स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्याचा दिवस सुटीचा असल्याने वाहतूक नियमन करणे सोपे होणार आहे, असे सांगितले.

मनपा आयुक्त राम, डॉ. सूर्यवंशी आदींनीही माहिती दिली.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पर्धेच्या अनुषंगाने सादरीकरण केले. गतवेळी अत्यंत कमी कालावधीच्या तयारीत ही आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा आयोजित करण्यात आली. येथील गड-किल्ले, ऐतिहासिक वारसा, पर्यटनस्थळे या स्पर्धेमुळे जागतिक नकाशावर पोहोचली. अत्यंत यशस्वीरित्या व सुरक्षित स्पर्धा आयोजित केल्यामुळे ‘युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल’ (युसीआय) या जागतिक संघटनेने आगामी स्पर्धेचा दर्जा युसीआय २.२ वरून २.१ असा उन्नत केला आहे. गतवर्षीच्या ४ च्या तुलनेत यावर्षी स्पर्धेचे ६ टप्पे असणार असून १ हजार ९९ कि.मी.ची ही स्पर्धा असणार आहे, असे त्यांनी सांगितले.

बैठकीत, गतवर्षी अतिशय चांगले आयोजन केल्याबद्दल प्रातिनिधिक स्वरूपात अंमलबजावणी यंत्रणांचा सत्कार करण्यात आला.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

वाहने भाड्याने घेऊन लाखो रुपयांची फसवणूक

Next

जागेच्या वादातून चिखलीत कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाला मारहाण

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme