पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – फॅक्टरी शेड व इलेक्ट्रीक कनेक्शन घेण्याच्या वादावरून एका कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाला सिमेंटच्या गड्ड्याने मारहाण केली. ही घटना २३ मे रोजी चिखली येथे घडली आहे.
सुशील गुप्ता, अनिल गुलाब शेलार आणि युवराज शेलार (सर्व रा. शेलारवस्ती, चिखली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अतुरसिंग दयालसिंग चंदानी (वय ५५, रा. निगडी, पुणे) यांनी गुरुवारी (दि. १० जून) रोजी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ऑफिस लॉक करून जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. ती जागा वडिलांनी लिलावात घेतल्याचे सांगताच आरोपींनी संगणमत करून फिर्यादीला मारहाण केली. आरोपीने सिमेंटचा गड्डा मारल्याने फिर्यादीचा दात पडला व कोयता दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहे.
जागेच्या वादातून चिखलीत कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाला मारहाण
