आंबेठाणमध्‍ये मजुरावर कटरने खुनी हल्ला

पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – भावाने मटणाचे जेवण बनवल्याने जेवण्यासाठी गेलेल्या एका मजुरावर कटरने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना खेड तालुक्‍यातील आंबेठाण येथे बुधवारी (दि. १० जून) रोजी रात्री साडेनऊ वाजताच्‍या सुमारास घडली आहे.
संतोष रामकिशन यादव (वय २७, रा. खराबवाडी, खेड, मूळ- उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. जगन्नाथ केदार यादव (वय ३८, रा. आंबेठाण, खेड) यांनी गुरुवारी (दि. ११ जून रोजी उत्‍तर महाळुंगे पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जेवण करत असताना आरोपीने त्यांना फोन करून खोलीबाहेर बोलावले. फिर्यादी बाहेर येताच आरोपीने जुन्या कारणावरून शिवीगाळ करत खिशातील कटर काढून फिर्यादीवर वार करून गंभीर दुखापत केली. पुढील तपास उत्तर महाळुंगे पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *