गॅस रिफेलिंग प्रकरणी एकावर गुन्‍हा

पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने सार्वजनिक रस्त्यावरील टपरीमध्ये गॅस रिफेलिंग करणाऱ्या एकावर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला. ही कारवाई बुधवारी रात्री पावणेनऊच्‍या सुमारास केली आहे.
धीरज बालाजी सूर्यवंशी (वय २१, रा. निघोजे, खेड, मूळ- लातूर) असे गुन्हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई गणेश बापू नागरगोजे यांनी गुरुवारी (दि. ११ जून) रोजी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने एलपीजी गॅस हा ज्वलनशील पदार्थ असल्याचे माहीत असतानाही सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेता बेकायदेशीरपणे त्याचा साठा केला होता. पोलिसांनी त्‍याच्‍याकडून पाच हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्‍त केला. दक्षिण महाळुंगे पोलीस अधिक तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *