गॅस चोरी प्रकरणी एकाला अटक

​पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस चोरून तो बेकायदेशीररीत्या छोट्या गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग करणाऱ्या एका दुकानदाराला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री पावणे अकरा वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली आहे.
गजानन रामराव पौळ (वय ४५, रा. चिंबळी, ता. खेड, मूळ- परभणी) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई अमित अनिल डिखळे यांनी आळंदी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना घरगुती सिलेंडरमधील गॅस रिफिलिंग सर्किटच्या सहाय्याने छोट्या ४ किलोच्या टाक्यांमध्ये भरत असताना पोलिसांनी छापा टाकला. त्याच्याकडून ३० हजार ४०० रुपयांचा अवैध गॅस साठा व साहित्य जप्त केले आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *