दहशत माजविणाऱ्या तडीपार गुंडाला अटक

पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – दोन वर्षांसाठी शहरातून हद्दपार केलेल्‍या आणि दहशत माजविणाऱ्या गुंडाला पोलिसांनी कोयत्‍यासह अटक केली.ही कारवाई गुरुवारी सकाळी सव्‍वासात वाजताच्‍या सुमारास निगडी येथे करण्‍यात आली.
​साहिल उर्फ बंट्या सुरेश चव्हाण (वय २१, रा. ओटास्कीम, निगडी) असे तडीपार गुंडाचे नाव आहे. पोलीस हवालदार दत्तात्रय बबन शिंदे यांनी निगडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्‍तांनी दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. मात्र त्याने कोणतीही परवानगी न घेता हद्दीत प्रवेश केला आणि ट्रान्सपोर्टनगर येथील इमारतीजवळ हातात लोखंडी कोयता घेऊन फिरत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *