पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – दोन वर्षांसाठी शहरातून हद्दपार केलेल्या आणि दहशत माजविणाऱ्या गुंडाला पोलिसांनी कोयत्यासह अटक केली.ही कारवाई गुरुवारी सकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास निगडी येथे करण्यात आली.
साहिल उर्फ बंट्या सुरेश चव्हाण (वय २१, रा. ओटास्कीम, निगडी) असे तडीपार गुंडाचे नाव आहे. पोलीस हवालदार दत्तात्रय बबन शिंदे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्तांनी दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. मात्र त्याने कोणतीही परवानगी न घेता हद्दीत प्रवेश केला आणि ट्रान्सपोर्टनगर येथील इमारतीजवळ हातात लोखंडी कोयता घेऊन फिरत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहे.
दहशत माजविणाऱ्या तडीपार गुंडाला अटक
