पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – काळेवाडी येथील जगताप डेअरी चौक ते शिवार गार्डन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील फुटपाथवर वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करणाऱ्या महिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १२ जून) रोजी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे.
या प्रकरणी दोन महिलांवर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलीस हवालदार प्रमोद ज्ञानदेव कदम (वय ३९, यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईदीप लॉज आणि स्पॉट १८ मॉलच्या मधोमध असलेल्या फुटपाथवर महिला आरोपी सार्वजनिक ठिकाणी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लैंगिक हावभाव व शब्दांचा उच्चार करत होत्या. यामुळे सार्वजनिक सभ्यतेचा व शिष्टाचाराचा भंग झाल्याने ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास काळेवाडी पोलीस करीत आहेत.
अश्लील हावभाव करणाऱ्या महिलांवर कारवाई
