​अश्लील हावभाव करणाऱ्या महिलांवर कारवाई

पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – काळेवाडी येथील जगताप डेअरी चौक ते शिवार गार्डन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील फुटपाथवर वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करणाऱ्या महिलांवर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १२ जून) रोजी संध्याकाळी साडेसहा वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली आहे.
​या प्रकरणी दोन महिलांवर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलीस हवालदार प्रमोद ज्ञानदेव कदम (वय ३९, यांनी काळेवाडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईदीप लॉज आणि स्पॉट १८ मॉलच्या मधोमध असलेल्या फुटपाथवर महिला आरोपी सार्वजनिक ठिकाणी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लैंगिक हावभाव व शब्दांचा उच्चार करत होत्या. यामुळे सार्वजनिक सभ्यतेचा व शिष्टाचाराचा भंग झाल्याने ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास काळेवाडी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *