पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – भोसरी एमआयडीसी हद्दीतील मोशी, आदर्श नगर येथील कचरा डेपोजवळ एका नविन बांधकामाच्या भिंतीच्या आडोशाला बेकायदेशीररित्या विक्रीसाठी १० हजार रुपये किमतीचा गांजा बाळगणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १२ जून) रोजी रात्री करण्यात आली.
अर्जुन थापा उर्फ विश्वकर्मा (वय १९, रा. कल्याण कॉलनी, मोशी) याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस शिपाई आनंद किसन जाधव (वय २८) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण कॉलनी नं. १ मधील कचरा डेपोजवळ आरोपी आपल्या ताब्यात विक्रीच्या उद्देशाने २०० ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ अनाधिकाराने बाळगून असताना मिळून आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.
गांजा बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल
