पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – ‘Botbro’ नावाच्या वेबसाईटद्वारे गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून एका तरूणाची व त्याच्या मित्राची २१ लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना सेंट उर्सुला शाळेजवळ, निगडी येथे १७ ते २२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान घडली.
सुयश सुनील शहापुरे (वय २४, रा. बिजलीनगर, चिंचवड), सुजीत सुनील काळे (वय २६, रा. मुकाई चौक, किवळे) आणि खुशी तिवारी (वय २५, रा. तळेगाव दाभाडे) व इतर एक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत निगडीतील २३ वर्षीय तरुणाने शनिवारी (दि. १३ जून) रोजी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला ‘Botbro’ वेबसाईटवर गुंतवणूक केल्यास दरमहा ७ ते ८ टक्के परतावा मिळेल असे सांगून २१ लाख ४८ हजार ४९० रुपये वेगवेगळ्या खात्यांवर भरून घेतले व नंतर परतावा न देता फसवणूक केली. पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.
गुंतवणुकीच्या नावाखाली निगडीमध्ये २१ लाखांचा गंडा
