ऊसतोडीच्या पैशांच्या वादातून भावाला डांबले

पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – ऊसतोडीच्या उचल घेतलेल्या पैशांच्या वादातून कामगार पळून गेल्याच्या कारणावरून एका तरुणाच्या भावाला डांबून ठेवले. ही घटना माण (ता. मुळशी) व अनगर (ता. मोहोळ, सोलापूर) येथे घडली आहे.
दत्तात्राय कोळेकर (वय ४०, रा. अनगर गाव, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. देवानंद कैलास आडे (वय २५, रा. पिंपळे निलख. मूळगाव यवतमाळ) यांनी शनिवारी (दि. १३ जून) रोजी हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या भावाने आरोपीकडून उचल घेतली होती. मात्र यातील मजूर पळून गेल्याने, आरोपीने भावाला उचल घेतलेले ६ लाख रुपये आणून दे आणि भावाला घेऊन जा, असे म्हणून ९ एप्रिल २०२६ पासून अनगर येथील घरी डांबून ठेवले आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *