पगार उशिरा दिल्याने लेबर कॉन्ट्रॅक्टरला लाकडी दांडक्याने मारहाण

पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – लेबर कॉन्ट्रॅक्टरने मजुरीचा पगार उशिरा दिल्याच्या रागातून चार जणांनी कॉन्ट्रॅक्टरला रस्त्यात अडवून लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना बावधन येथे १२ जून रोजी रात्री साडेआठ वाजताच्‍या सुमारास घडली.
आकाश मोरे, विलास गवळी आणि त्‍यांचे दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पिंटू परमेश्वर शर्मा (वय ४२, रा. बावधन, पुणे, मूळगाव बिहार) यांनी बावधन पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.​ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दुचाकीवरून मजूर घेऊन परतत असताना, पगार उशिरा मिळाल्यामुळे चिडलेल्या आरोपींनी त्यांच्या गाडीची काच फोडली. लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून डाव्या मांडीवर व पायावर दुखापत केली. पुढील तपास बावधन पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *