बहिणीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार

पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – भाचा गुटख्याची पुडी का घेऊन आला नाही या कारणावरून भाच्याला मारहाण करणाऱ्या भावाला रोखण्यास गेलेल्या सख्ख्या बहिणीवर डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. ही घटना चिखलीत शनिवारी (दि. १३ जून) रोजी मध्‍यरात्री साडेबानरा वाजताच्‍या सुमारास मोरेवस्ती येथे घडली.
संतोष पांडुरंग कांबळे (वय ४२, रा. दत्त हौसिंग सोसासयटी, टॉवर लाईन, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. प्रियांका सचिन कदम (वय ३५, रा. मोरेवस्ती, चिखली, पुणे) यांनी चिखली पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष हा भाचा रोहन याला गुटखा न आणल्याने मारत होता. फिर्यादी बहीण भांडण सोडवण्यास गेली असता आरोपीने ‘तुला काय करायचे आहे’ असे म्हणून कुऱ्हाडीने तिच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *