​जमीन व्यवहाराच्या पैशांवरून घरात घुसून मारहाण

​पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – भावाने जमीन व्यवहारासाठी घेतलेल्या पैशांच्या कारणावरून चिडून जाऊन घरात घुसून मारहाण केली. ही घटना मावळ तालुक्‍यातील बधलवाडी येथे १२ जून रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. समीर जाधव (रा. गोळेवाडी, ता. मावळ), अनिकेत लोहार, शुभम लोहार आणि त्‍याचे नऊ साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. निलेश बाळासाहेब दहातोंडे (वय २८, रा. बधलवाडी, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.​ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समीर जाधव याने इतर आरोपींना फोन करून बोलावले व फिर्यादीच्या घरासमोर जमून शिवीगाळ व दमदाटी करत फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.​ पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *