पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य विमल गुटखा आणि सुगंधित सुपारी स्वतःच्या फायद्यासाठी विक्रीकरिता बाळगणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई देहूरोड येथील डायमंड वन सोसायटीत १२ जून रोजी करण्यात आली.
प्रविणकुमार कपुरचंद राठोड (वय २१, रा. साईनगर, देहूरोड) याला अटक केली आहे. पोलीस अंमलदार राहुल दादाभाऊ पावशे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानवी शरीराला घातक असलेला २४ हजार २०० रुपये किमतीचा प्रतिबंधित विमल गुटखा विक्रीसाठी घरात बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.
देहूरोडमध्ये २४ हजारांच्या गुटखा जप्त
