कडजाई माता मंदिराची दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – मावळ तालुक्यातील इंदोरी येथील कडजाई माता मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दानपेटीतील रोकड चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. १२ जून) रोजी उघडकीस आली.
​याप्रकरणी मंदिराच्या पुजारी वनिता घनश्याम नाणेकर / गुरव (वय ५२, रा. शिवशक्ती चौक, इंदोरी, ता. मावळ) यांनी रविवारी (दि. १४ जून) रोजी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कुणाल बाळु विर (वय २३, रा. चाकण, खेड) आणि लोबो उर्फ सुर्या सिरमोनंत दास (वय २६, रा. कडाचीवाडी, चाकण) या दोन आरोपींना अटक केली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आरोपींनी मंदिराचा कडीकोयंडा आणि कुलूप उचकटून गाभाऱ्यात प्रवेश केला. तेथील दानपेटी तोडून भाविकांनी दान केलेली अंदाजे सात हजार रुपयांची रोख रक्कम फिर्यादींच्या संमतीशिवाय चोरून नेली. या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *