फ्लॅश नावाच्या जुगारावर पोलिसांचा छापा

पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – पैशांवर ‘फ्लॅश’ नावाचा पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. ही कारवाई हिंजवडी फेज ३ मधील भोईरवाडी येथे खुल्या मैदानात शनिवारी (दि. १३ जून) रोजी सायंकाळी सहा वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.
पोलीस शिपाई अरुण महादु पारधी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. सचिन प्रकाश राठोड (वय २६), जयपाल गणेश राठोड (वय २६) आणि धनंजय शंकर गाढवे (वय ३४, सर्व रा. हिंजवडी) यांच्‍यावर गुन्‍हा दाखल केला आहे. जुगार चालक उमेश राठोड (रा. भोईरवाडी) याच्‍यावरही गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोईरवाडी येथे आरोपी पैसे लावून जुगार खेळत होते. पोलिसांची चाहुल लागताच मुख्य आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळाला. पोलिसांनी घटनास्थळावरून पत्ते आणि रोख रकमेसह ४७० रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त केले. पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *