सावरदरीत अफीमसह दोघांना अटक

पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत दोन लाख रुपये किमतीचा ३९६ ग्रॅम अफीम जप्त केला आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई खेड तालुक्यातील सावरदरी येथे शनिवारी (दि. १३ जून) रोजी रात्री नऊ वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.
​अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस शिपाई गोविंद देवराम डोके यांनी उत्‍तर महाळुंगे पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. भवरलाल सोनाराम जाट (वय ३४, रा. चाकण) आणि महेंद्रसिंग चिमणाराम (वय २५, रा. सावरदरी, खेड) यांना अटक केली असून, मुख्य आरोपी मोहन धनाराम जाट (वय २२) याचा शोध सुरू आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावरदरी येथे सार्वजनिक रस्त्याच्या कडेला आरोपी संगनमत करून अफीम हा अंमली पदार्थ विक्रीसाठी वाहतूक करत असताना सापडले. त्यांच्याकडून २ लाखांचा अफीम, एक मोटारसायकल आणि दोन मोबाईल जप्त केले. हा माल महेंद्रसिंग याच्याकडून आणल्याचे आरोपींनी कबूल केले. पुढील तपास उत्तर म्हाळुंगे पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *