कासारवाडीत देशी दारू विकणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – कासारवाडी येथील सरिता अपार्टमेंटच्या पाठीमागे अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. १४ जून) रोजी रात्री नऊ वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली आहे.
पोलीस शिपाई अरविंद सिध्दन्ना जाधव यांनी दापोडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. बंदुसिंह निर्भससिंह ठाकुर (वय २३, रा. कासारवाडी) या आरोपीला अटक केली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री नऊच्या सुमारास आरोपी सरिता अपार्टमेंटच्या पाठीमागे देशी दारू बाळगून ग्राहकांना अवैधरित्या विक्री करत होता. पोलिसांनी छापा टाकून त्याच्या ताब्यातून तीन हजार ८४० रुपये किमतीचा ‘देशी दारू’चा साठा जप्त केला आहे. पुढील तपास दापोडी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *