चाकण चौकात कंटेनरच्या धडकेत महिला ठार

पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – चाकण येथील तळेगाव चौकात भरधाव कंटेनरने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या महिला पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. १४ जून) रोजी रात्री साडेअकरा वाजताच्‍या सुमारास घडली.
रोहिणी हिरासिंग दुरवे (रा. आंबेठाण, ता. खेड) असे अपघातात मृत्‍यूमुखी पडलेल्‍या महिलेचे नाव आहे. साईनाथ महादेव माकणे (वय २०, रा. आंबेठाण रोड, चाकण) या रुग्‍णवाहिका चालकाने सोमवारी (दि. १५ जून) रोजी उत्‍तर चाकण पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. शंकर बळीराम जाधव (वय ३८, रा. रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनसार, कंटेनरने धडक दिल्‍यामुळे रोहिणी या गंभीर जखमी झाल्या. त्‍यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.उत्‍तर चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *