अश्लील चाळे करणाऱ्या महिलेवर कारवाई

पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करून, अश्लील हावभाव व शब्दांचा वापर करत सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्‍याप्रकरणी एका महिलेवर गुन्‍हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. १५ जून) सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास मॅगझीन चौक, दिघी-आळंदी रस्ता येथे करण्यात आली.
या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ खळसोडे यांनी सोमवारी (दि. १५ जून) रोजी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी महिलेवर ‘पिटा ॲक्ट’ अंतर्गत गुन्‍हा दाखल करीत तिला नोटीस देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अश्लील हावभाव व शब्दांचा वापर करत सार्वजनिक सभ्यतेचा भंग केला. दिघी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *