पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – पिंपरीतील कामगार भवनच्या पाठीमागे पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या टोळीवर पोलिसांनी छापा टाकून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले. ही कारवाई सोमवारी (दि. १५ जून) रोजी दुपारी कन्नड गल्ली, दुर्गामाता मंदिराजवळ करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील धावारे यांनी सोमवारी (दि. १५ जून) रोजी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सैदप्पा सकरप्पा नाटेकर (वय ५३), पांडुरंग विठ्ठल सोनपाखरे (वय ५६), गंगाराम धोंडुराम बनपट्टे (वय ४२), हनुमंत अशोक भिंगे (वय ६०), दिलीप शिवाजी थोरात (वय ६०) आणि लक्ष्मण मायराप्पा म्हेत्रे (वय ३५, सर्व रा. पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करून नोटीस देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एकत्र जमून तीन पत्त्यांचा जुगार खेळत बसले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून तीन हजार ३० रुपये रोख रक्कम आणि जुगाराची पाने जप्त केली आहेत. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.
जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ६ जणांवर गुन्हा
