पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली ही कारवाई रविवारी (दि. 14 जून) सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास दिघी येथे करण्यात आली.
शेखर संभाजी जाधव (वय २५, रा. उदगीर, जि. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे पोलीस शिपाई गणेश सावंत यांनी सोमवारी (दि. १५ जून) रोजी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेखर हा शस्त्र बाळगण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नसताना हे शस्त्र शहरात घेऊन फिरत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केले. दिघी पोलीस तपास करत आहेत.
पिस्तूल बाळगल्या प्रकरणी एकास अटक
