माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची लोकायुक्त सदस्यपदी नियुक्ती

मुंबई : राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची लोकायुक्त या न्यायिक संस्थेच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली असून आता त्या अधिकारी व लोकप्रतिनिधींविरोधातील भ्रष्टाचाराच्या तक्रारींच्या तपास प्रक्रियेत सहभागी राहणार आहेत.

लोकायुक्त ही राज्यातील भ्रष्टाचार व गैरव्यवहारांविरोधातील तक्रारींची दखल घेणारी महत्त्वाची न्यायिक संस्था असून या नियुक्तीनंतर रश्मी शुक्ला यांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे. प्रशासनातील पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या प्रक्रियेत त्यांचा सहभाग असणार आहे.

दरम्यान, या नियुक्तीनंतर प्रशासकीय व राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून ही नियुक्ती आगामी काळात महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *