मॉस्को(Moscow) : युक्रेनने रशियाची राजधानी मॉस्को आणि आसपासच्या भागांवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ला केला असून, युद्ध सुरू झाल्यापासून राजधानीवरील हा सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक मानला जात आहे.
रशियन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मॉस्को परिसरात शेकडो ड्रोन पाठविण्यात आले. हल्ल्यानंतर काही ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या असून आकाशात धुराचे लोट दिसून आले. तसेच काही विमानतळांच्या कामकाजावरही परिणाम झाला.
मॉस्को प्रदेशाचे गव्हर्नर आंद्रेई वोरोब्योव यांनी या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याची माहिती दिली. दरम्यान, या हल्ल्यामुळे रशिया-युक्रेन युद्धातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
