Ahilyanagar-मोहरम मिरवणुकीवरून राजकीय वाद; आमदार संग्राम जगतापांवर एमआयएमचा आरोप

अहिल्यानगर(Ahilyanagar) : अहिल्यानगर शहरात मोहरम मिरवणुकीला सावेडी परिसरातून विरोध दर्शवण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनावर एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. परवेझ अशरफी यांनी तीव्र प्रतिक्रिया देत आमदारांवर वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या भूमिकेमुळे सामाजिक सलोखा धोक्यात येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे शहरातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तणावपूर्ण बनले असून प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. विविध पक्षांकडून यावर प्रतिक्रिया उमटत असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *