मुंबई(Mumbai) : देशातील सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज असलेल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) च्या बहुप्रतीक्षित प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावाला (IPO) गती मिळाली आहे. एनएसईने बाजार नियामक भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ कडे आपला ‘ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ (DRHP) दाखल केला आहे.
हा प्रस्ताव मंजूर झाल्यास, हा भारतातील आजवरच्या सर्वात मोठ्या आयपीओंपैकी एक ठरू शकतो, अशी बाजारात चर्चा आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे आणि भांडवली बाजारातील तज्ज्ञांचे या घडामोडीकडे विशेष लक्ष लागले आहे.
एनएसईचा आयपीओ बाजारात आल्यास देशातील भांडवली बाजाराला मोठी तरलता मिळण्याची शक्यता असून, संस्थात्मक तसेच किरकोळ गुंतवणूकदारांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.
